भोकर :- (रमेश गंगासागरे )

एसटी झाली 71 वर्षाची

    आज 1 जून रोजी एस टी महामंडळ भोकर येथे सकाळी दहा वाजता एसटीचा 71 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशातील सर्व शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, यावेळी भोकरच्या नगराध्यक्ष सौ संगीता विनोद चिंचाळकर, उपनगराध्यक्ष जरीना बेगम शेख युसुफ, नगरसेविका सुवर्णा दिलीप वाघमारे, नगरसेविका डॉ,अनिता राठोड व पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती, प्रमुख पाहुणे यांच्यावतीने एसटीने प्रवास करणार्‍या नागरिकांना वर्धापन दिनानिमित्त मिठाई देण्यात आली. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आगार प्रमुख श्री एस डी पवार, स्थानक प्रमुख व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली होती.