भोकर तालुक्यात वादळी वारे; वीज पडून दोन म्हशी ठार तर एका शेतकऱ्याची लिंबूची बाग उध्वस्त



भोकर :-(रमेश गंगासागरे )   

       भोकर शहरासह तालुक्यात आज मेघगर्जनेसह वादळी वारे वाहत असल्याने तालुक्यातील हळदा येथील एका शेतकऱ्याच्या दोन म्हशी वीज पडून ठार झाल्या तर रायखोड येथील एका शेतकऱ्याची लिंबूची अर्धी बाग उद्ध्वस्त झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
       आज दिनांक 3 जून रोजी संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान भोकर तालुक्यात वादळी वारे वाहत होते यादरम्यान आकाशात मेघगर्जनेसह विजांचा लखलखाट होत होता, याच वेळी हळदा येथील शेतकरी नामे संजय चांदू टिकेकर त्यांच्या दोन म्हशी वर वीज कोसळली त्यात त्यांचे 1 लाख 20 हजारांचे नुकसान झाले आहे, तर दुसऱ्या एका घटनेत भोकर पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत बिल्लेवाड यांच्या रायखोड येथील शेतातील लिंबूची अर्धी अधिक बाग नष्ट झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे, यातील हळदा येथील घटनेचा भोकर तहसीलचे मंडळ अधिकारी यांनी पंचनामा केला असून रायखोड येथील लिंबू च्या बागेचा पंचनामा होणे शिल्लक आहे, तालुक्यात नुकसानीचा मोठा अंदाज वर्तविण्यात येत असून उद्यापर्यंत सर्व माहिती हाती येईल.