भोकर तालुक्यातील ह्रदयद्रावक घटना

भोकर : (रमेश गंगासागरे )  तालुक्यातील बोरवाडी शिवारातील शेषराव कोठुळे यांच्या शेतातील विहिरीत पडुन  आज दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी 19 जुन रोजी उघडकीस आली आहे.
       याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील बाचोटी येथील विठ्ठल श्रीरंग वाघमारे वय 25  आणि आश्वीनी शेषराव वागदकर  वय 15 हे दोघेही बोरवाडी शिवारातील  बंधार्याच्या कामावर मजुर म्हणून काम करित होते. शेषराव कोठुळे यांच्या शेतातील  विहीतुन पाणी आणण्यासाठी गेले आसता पाय घसरून पडल्याने  मृत्यू झाल्याची तक्रार मुलींच्या वडीलांनी दिल्यावरून भोकर पोलीसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आसली तरी मुलांकडुन आध्याप  कसल्याच प्रकारची तक्रार देण्यात आलेली नाही.  याबाबत अधिक  तपास पोलीस  करित आहेत. याघटनेबाबत परिसरात यांच्या मृत्यू विषयी उलट सुलट चर्चा जोर धरली आहे.