लातूर (रमेश गंगासागरे ):-
अनेक जण सहजपणे रस्त्यावर सर्रास कचरा टाकत असतात. यावर प्रशासन वेळोवेळी जनजागृती करत असते. मात्र, तरी देखील याचे सर्रास उल्लंघन केले जाते. लातूर शहरातील अशाच चार दुकानांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे.
वारंवार सुचना देवूनही रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या या चार दुकानांना सील ठोकण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व महानगरपालिका आयुक्त एम.डी. सिंह यांनी दिले. या आदेशानुसार मनपाच्या स्वच्छता पथकाने या दुकानांविरोधात तत्काळ कार्यवाही केली. अंबाजोगाई रोडवरील काही दुकानदार रस्त्यावर तसेच डिवायडरमध्ये कचरा टाकत होते. याचा त्रास नागरिकांना होत होता. नागरिकांनी यासंबंधीची तक्रार महानगरपालिकेला दिली. याबाबत मनपा प्रशासनाने संबंधित दुकानदारास वारंवार सूचना दिली. मात्र, तरीही या व्यापाऱ्यांकडून रस्त्यावरच कचरा टाकला जात होता. दरम्यान काल, शनिवारी (दि.४) सांयकाळी जिल्हाधिकारी जी . श्रीकांत व मनपा आयुक्त एम.डी. सिंह यांनी स्वत: घटनास्थळी जात पाहणी केली. यावेळी त्याठिकाणी त्यांना कचरा असल्याचे निदर्शनास आले. यावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आणि आयुक्त सिंह यांनी संबंधित दुकाने सील करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार मनपाच्या स्वच्छता पथकाने या दुकानांविरोधात तत्काळ कार्यवाही केली. यात लीकॅफे, केतकी पावभाजी, श्री कृष्ण रिफ्रेशमेंट सेंटर व प्रियंका जनरल स्टोअर्स या दुकानांचा समावेश आहे. ही कारवाई सहाय्यक आयुक्त वसुधा फड, उज्ज्वला शिंदे, स्वच्छता निरीक्षक कलीम शेख, रवी कांबळे, अतिक्रमण विभाग प्रमुख शेख, यांच्यासह आदी. कर्मचाऱ्यांनी केली.

0 Comments