ब्रेकिंग न्यूज

भोकर येथील एसटी महामंडळ चे डेपो मॅनेजर श्री पावरा यांचे दुःखद निधन

रमेश गंगासागरे :-  

आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार

भोकर एसटी महामंडळ येथील डीएम (डेपो मॅनेजर) श्री पावरा यांचे आज त्यांच्या राहत्या घरी मंजुळा नगर येथे आकस्मित निधन झाले, श्री पावरा हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे असून ते एसटी महामंडळ भोकर येथे मागील दोन वर्षांपासून कार्यरत होते त्यांनी उत्तम पणे आपली कर्तव्य याठिकाणी बजावली असून सर्वांसोबत हसत खेळत काम करुन घेण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे एस टी महामंडळ कर्मचारी वर्गावर दुःखाचा डोंगर पसरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या निधनाचे कारण त्यांचे जवळचे नातेवाईक आल्यावरच कळणार असल्याचे भोकर पोलिसांनी सांगितले आहे.