मुलाच्या लग्नपत्रिका भोकर मध्ये वाटप करून गावाकडे जात असतांना झाला अपघात
रमेश गंगासागरे :-
शनिवार व रविवार अपघात दिवस ठरला असून ह्या दोन दिवशी भोकर तालुक्यात तिघांचा बळी गेला आहे.
शनिवारी लामकाणी येथील मंगेश जाधव पाटील तर, रविवारच्या अपघातात बळी ठरलरलेले ईसम नामे माधव पोशटी बील्लेवाड वय 50 वर्ष,व संतोष शामराव भुसाळे वय 32 वर्ष दोघेही राहणार सवना तालुका हिमायतनगर येथील रहिवाशी असून हे दोघे लग्न पत्रिका वाटण्यासाठी भोकर येथील आपल्या नातेवाईकाकडे रविवारी आले होते, नातेवाईकाकडे संध्याकाळी जेवण करून सवना ह्या गावी आपल्या दुचाकीवरून परत जात असताना भोकर येथील सुधा नदीवर रविवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली, ही धडक एवढी भयानक होती की, या धडकेत दोघेही जागीच मरण पावले. यातील संतोष भुसाळे यांना ट्रकने अर्धा किलोमीटर दूर पर्यंत ओढत नेले होते.
अपघात घडताच ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला होता, भोकर पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करून सदरील अपघातग्रस्त ट्रक व ट्रक चालकास भोकर तालुक्यातील धावरी ह्या गावी पकडले असल्याचे वृत्त आहे, या अपघातात मयत झालेल्या दोघांवरही भोकर ग्रामीण रुग्णालयांमध्ये उत्तरीय तपासणी करण्यात आली असून दोघांचेही मृतदेह रात्री त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. हे दोघे मयत भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते माधव बिल्लेवाड आणि संत गाडगे बाबा आश्रम शाळेवरील सहशिक्षक पिंगलवाड सर यांचे जवळचे नातेवाईक असल्याचे समजते या अपघातामुळे संबंध तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
0 Comments