भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवार दिनांक 6 मे रोजी नाल्या तुंबल्या मुळे साचलेल्या घाण सांडपाण्यातून जाण्या-येण्यासाठी नागरिकांना रस्ता शोधन्याची वेळ आली.
शहरात मागील काही दिवसापासून तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक पाणीटंचाईचा सामना करताना दिसून येत आहेत, अशातच आज सोमवार दिनांक 6 मे रोजी सकाळपासून भोकरची शोभा वाढवणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात यामुळे प्रचंड प्रमाणावर घाणपाणी रस्त्यावर साचले होते, त्यामुळे या चौकाला तळ्याचे स्वरूप आलेले दिसून आले ,यातूनच अनेक महिला, मुली, नागरिक व वाहनधारकांना रस्ता शोधावा लागला, दुपारपर्यंत तरी तुंबलेल्या नाल्या काढण्याचे काम नगरपरिषदेच्या वतीने हाती घेण्यात आलेले नव्हते, त्यामुळे नागरिकांना या दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागला. पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील नाल्या सफाईचे काम अजून तरी हाती घेण्यात आले नाही, त्यामुळे शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर नाल्या तुंबून नागरिकांना त्याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून नगरपरिषदेच्यावतीने नाल्या सफाईचे कार्य हाती घेण्यात यावे अशी मागणी भोकर येथील नागरिक करत आहेत.
आता मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरूवात होण्यास काही अवधी शिल्लक असताना शहरातील रस्ते, पथदिवे, नाल्या दुरुस्तीकडे लक्ष देण्यात यावे अशी मागणी समाज बांधवांनी आज पोलीस स्टेशन भोकर येथे आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे. या बैठकीस पोलीस निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भाले यांच्यासह शहरातील अनेक मुस्लीम बांधव नागरिक आणि पत्रकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

0 Comments