ब्रेकिंग न्युज

भोकर :(रमेश गंगासागरे )  भोकर किनवट रोडवर असलेल्या सुधा नदीवर आत्ता दहा वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन दुचाकीस्वार चालकांचा  चेंदामेंदा झाला आहे.
         भोकर येथे शनिवार आणि रविवार सलग दोन दिवशी अपघाताची मालिका चालू असून शनिवारी लामकानी येथील युवक रायखोड जवळ अपघातात ठार झाला, तर आत्ता रविवार दिनांक 5 मे 2019 रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान किनवट भोकर रोड वरील सुधा नदीच्या पुलावर दोन दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने चिरडल्याने त्यांचा चेंदामेंदा झाला आहे, अपघात एवढा भीषण होता की मयता पैकी  एकास अर्धा किलोमीटर दूर पर्यंत अज्ञात वाहनाने ओढत नेले होते. सदरील मयत झालेले इसम हे हिमायत्नगर येथील असल्याचे कळते. घटना कळताच भोकर पोलीस तात्काळ घटनास्थळावर पोहोचले असून त्यांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आणण्याची तयारी चालू आहे.