भोकर :-(रमेश गंगासागरे ) बेंबर तालुका भोकर जिल्हा नांदेड येथील एका शेतकऱ्याच्या आखाड्यास अचानक आग लागल्याने अनेक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले यात शेतकऱ्याचे जवळपास दीड लाखाचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केल्या जात आहे, ह्याच दिवशी शेतकर्याच्या मुलीचे लग्न होते त्यामुळे मोठी हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
घटनेबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, बेंबर येथील शेतकरी अशोक नरसन्ना भुसनवाड यांच्या मुलीचे लग्न बुधवार दि, 15 रोजीच होते, याच दिवशी त्यांच्या शेतातील आखाडयास अचानक आग लागली, या लागलेल्या आगीत आखाडा पूर्णपणे जळून खाक झाला आहे, त्यात ठेवलेली जवळपास 30 क्विंटल कच्ची हळद, 1500 पेंढी प्राण्यांचा चारा, 10 पोते टाळकी ज्वारी, तसेच शेती ऊपयोगी साहित्य जळुन खाक झाले आहे, अत्यंत मेहनती आणि कष्टाळू शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, शेतीत काबाडकष्ट करून मेहनतीने कमावलेले अन्नधान्य आगीमध्ये नष्ट झाल्याने ह्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे शासनाने त्वरित पंचनामा करून सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.



1 Comments
sad news
ReplyDelete