भोकर :-रमेश गंगासागरे
मागील दोन महिन्यापासून प्रचंड ऊन पडत असून या उन्हात ऊन लागल्याने अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, परवाच भोकरमध्ये ऊन लागल्याने भोकर येथील गोरे नावाचा युवक मृत्युमुखी पडला, या गर्मीने सगळीकडे हाहाकार माजवला असून भोकर शहरात आज 04:15 पासून अवकाळी पाऊस पडत असल्याने प्रचंड उन्हात होरपळणाऱ्या भोकर वासियांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.

यावर्षी उष्णतेने सर्व रेकॉर्ड मोडले असून फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रचंड उन्हाळ्याची जाणीव होऊ लागली होती, अशातच एप्रिल आणि मे मध्ये तापमान 44 अंश सेल्सिअस च्यावर पोचले होते, आज सकाळपासूनच वातावरणात ढगाळ होते, त्यामुळे दिवसभर तापमान 44 वरून घसरून 41 वर आले होते, संध्याकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली तब्बल पंधरा मिनिटे अवकाळी पाऊस शहरावर पडत होता, त्यामुळे गरमीने त्रस्त झालेल्या भोकर वासियांना आज थोडाफार दिलासा मिळाला आहे. आता उन्हाळा नको रे बाबा असे म्हणत लवकर मान्सून यावा अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगून असल्याचे दिसून येते.

0 Comments