भोकर / कोळगाव :- रमेश गंगासागरे
पाणी फाउंडेशन स्पर्धेत सहभागी झालेल्या भोकर तालुक्यातील कोळगाव बुद्रुक या गावाला सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय घंटलवार यांनी स्वतः श्रमदान करत एक लक्ष रुपयांची देणगी देऊन नवा विक्रम केला आहे.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत पाणी फाउंडेशन ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भोकर तालुक्यातील अनेक खेड्यांनी सहभाग घेऊन जमिनीत पाणी मुरविण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले असून त्यातच कोळगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात श्रमदानाचे कामे हाती घेऊन श्रमदान केली आहेत, या गावातील नागरिकांची मेहनत लक्षात घेऊन भोकर येथील सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय घनटलवार यांनी तेथील ग्रामस्थांना 1 लक्ष रुपयांची देणगी दिली आहे.
कोळगाव येथील नागरिकांची मेहनत पाहता राज्य पातळीवर प्रथम क्रमांक हे गाव पटकावेल अशी आशा भोकर तालुक्यातील नागरिक बाळगत आहेत, यावेळी एक लक्ष रुपयांचा धनादेश तेथील सरपंच वैशाली रंगराव कदम यांच्याकडे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय घंटलवार यांनी दिला यावेळी सुरेश दंडवते, सचिन तेललवार, प्रशांत आडे, संकेत नेमानिवार, संतोष सोनवने, सुदीप राहुलवाड, बालाजी सिंगेवार, नागेश माने, पवन सूर्यवंशी, व्यंकटेश पदमवार , गजानन आडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

0 Comments