भोकर :- (रमेश गंगासागरे ) सध्या सगळीकडे उन्हाचा कडाका वाढला असून तापमान 44 अंशाच्या वर गेले आहे, अशा तापमानात अंगाची लाही-लाही होत असताना वाटेतच जर पादचाऱ्यांना थंड पाणी तेही मोफत पिण्यास भेटले तर,,,, होय हे खरे आहे भोकर शहरातील व्यापारी व दुकानदारांनी माणुसकी जपली असून जागोजाग आपल्या दुकानांसमोर पादचाऱ्यांना थंड पाण्याचे जार पिण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत, त्यामुळे या व्यापाऱ्यांची सगळीकडे वाहवा होत आहे.
यावर्षीचा उन्हाळा अतिशय खडतर असून या उन्हात शक्यतोवर नागरिक बाहेर पडणे पसंत करत नाहीत पण जरुरी कामांसाठी त्यांना शेवटी बाहेर पडणे गरजेचे आहे, अशातच घसा कोरडा झाला तर,,,,, या वाढत्या तापमानात पाण्यावाचून कोणीही राहू नये म्हणून माणुसकी जपत येथील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर थंड फिल्टर पाण्याचे जार पिण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत, यात हिंदू बांधवांसोबत मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणात सामील झाले असून भोकर येथील शिवाजी चौक, आंबेडकर चौक, तहशीलच्या पुढे, नांदेड रोड आणि किनवट रोड आदी भागात अशा व्यापाऱ्यांनी थंड पिण्याचे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे, अंगाची लाही लाही होणाऱ्या उन्हाने आजपर्यंत अनेक पशु पक्षांचे व प्राण्यांचे जीव घेतले आहेत, या उन्हात माणुसकी जपत स्वखर्चाने नागरिकांसाठी पाणी उपलब्ध करून देणाऱ्या व्यापाऱ्यांचे सर्व वर्गातून अभिनंदन होत आहे.

0 Comments