भोकर :(रमेश गंगासागरे ) नांदेड लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान भोकर व भोकर तालुक्यात अनेक पैजा लावण्यात आल्या होत्या, आता या पैजेत अनेक जण गारद झाल्याची माहिती पुढे येत आहे.

       नांदेड 2019 लोकसभेची निवडणूक अत्यंत उत्कंठा वर्धक झाल्याने या उत्कंठा वर्धक  व चुरशीच्या लढाईत भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बाजी मारल्याने  काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना अनपेक्षितपणे या निवडणुकीत धक्का लागला, त्यामुळे तालुक्यात पैजा लावणाऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून लाखो रुपयांच्या पैजा लावणाऱ्या खेळाडूंची पार गारद झाल्याचे आता उघडकीस येत आहे, शहरात प्रत्येक ठिकाणी अशोक चव्हाण निवडून येतील या भावनेने अनेक नागरिकांनी निवडणुकीदरम्यान अशोक चव्हाण यांच्या बाजूने पैजा लावल्या होत्या, पण नागरिकांनी अनपेक्षितपणे भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बाजूने कौल देत काँग्रेसच्या अशोक चव्हाणांना विजयापासून दूर ठेवले त्यामुळे यात पैसा लावणार्‍यांचे अतोनात नुकसान झाल्याचे उघड होत आहेत भोकर मधील चौकाचौकात माझे अमुक एवढे पैसे गेले म्हणणारे आज दबक्या आवाजात चर्चा करताना दिसून येत आहेत, त्यामुळे भोकर व तालुक्यात निवडणुकीदरम्यान कोट्यावधी रुपयांचा व्यवहार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पैजा लावणार्‍या खेळाडूंचे आता पुढील लक्ष भोकर विधानसभा असल्याचे स्पष्ट होत आहे.