भोकर :- (संदीप गंगासागरे ) यंदा बारावीच्या निकालांमध्ये मुलींनी मोठ्या प्रमाणात बाजी मारली असून सगळीकडे मुलींचाच बोलबाला झाला आहे अशातच भोकर मधील एका गरीब केळे विक्रेत्याची मुस्लिम समाजातील मुलगी विज्ञान शाखेतून 81 % मार्क घेऊन भोकर तालुक्यात प्रथम आली असल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भोकर शहरात राहणारी कुमारी समरीन शिफा मुमताज हिने बारावी विज्ञान शाखेत 650 पैकी 527 गुण(81%) घेऊन तालुक्यांमध्ये मुलीत प्रथम येण्याचा मान पटकावला आहे, समरीन ही भोकर शहरातील कै. लक्ष्मणराव घिसेवाड ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी असून तिने भोकर शहरातील बिलाल नगर येथील पटेल सर यांच्या क्लासेस मधून विज्ञान शाखेची शिकवणी पूर्ण केली होती. तिचे वडील भोकर शहरात हात गाड्यावर केळी विक्रीचा व्यवसाय करून घर चालवतात, समरीन ही अत्यंत गरीब घराण्यातील मुलगी असल्याने तिला वेळोवेळी पटेल सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते, समरीनच्या यशाबद्दल लोकनेते नागनाथरावजी घिसेवाड, पटेल सर, संपादक रमेश गंगासागरे, मुख्याध्यापक जाधव सर यांच्यासह अनेकांनी तिचे अभिनंदन केले आहे.

0 Comments