भोकर :- (रमेश गंगासागरे ) नुकत्याच पार पडलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ऐकून 16 विद्यार्थी शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले आहेत.
शिक्षणाच्या बाबतीत पालकांची व विद्यार्थ्यांची पहिली पसंद असलेले विद्यालय म्हणून ज्या विद्यालयाकडे पाहिले जाते त्या शाहू महाराज विद्यालयातील तब्बल सोळा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत, त्यामुळे विद्यार्थांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, "कुमार वयातच शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे गेल्याने स्पर्धा परीक्षा, युपीएससी, एमपीएससी, विविध एन्ट्रंस एक्झामस् आदीबाबतची विद्यार्थांच्या मनातील नाहक भिती नष्ट होते. तसेच कठोर मेहनत व वेळेचा सदुपयोग याचे भान निर्माण होते. केवळ डाॅक्टर - इंजिनियर या व्यतिरिक्त असंख्य शाखेत करीयर घडवता येते याबद्दल विद्यार्थांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो." ज्या उद्देशाने शाहू ची मुहूर्तमेढ रोवली तो उद्देश सफल होत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पात्र विद्यार्थी संख्या मोठी असून त्यापाठीमागे स्वतः विद्यार्थी, त्यांचे सूज्ञ पालक व शाहूच्या शिक्षकांची मेहनत असून, गट शिक्षणाधिकारी भोकर, विस्तार अधिकारी श्री वाघमारे, केंद्र प्रमुख इ.चे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. त्याचाही खूप फायदा झाला. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाहू मध्ये वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने जादा तासिकांचे काटेकोर वेळापत्रक तयार करून अंमलबजावणी करण्यात आली. शाहूच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. गोविंदराव लामकानीकर, संस्थेचे संचालक शिरीषभाऊ गोरठेकर, विविध प्रतिष्ठित नागरिक व अनेक पत्रकार बंधुंनी अभिनंदन केले आहे. गतवर्षी केवळ तीनच विद्यार्थी सदरील शिष्यवृत्ती साठी पात्र ठरले होते. यानंतर शिष्यवृत्ती साठी पात्र विद्यार्थी संख्येचा आलेख दरवर्षी नक्कीच वाढत जाईल असा विश्वास मुख्याध्यापक संजय देशमुख कामनगावकर यांनी व्यक्त केला. पालकांनी यापुढे तरी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त संख्येने शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसवावे असे आवाहनही त्यांनी केले.

0 Comments