भोकर :- (रमेश गंगासागरे )   येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत मे- जुन 2019 अंतिम लेखी परीक्षेला 14 मे 2019 पासुन सुरूवात झाली असून या केंद्रावर बी.ए./ बी.काँम/ एम.ए./एम.एस्सी. पदवीचे एकुण 1458 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 
        सदरील परीक्षा या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्र प्रमुख डाँ. पंजाब चव्हाण आणि  प्रा. होरके गंगाधर व केंद्र संयोजक प्रा. होगे राधाकिशन  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत चालु आहेत.
         परीक्षा काँपीमुक्त व सुरळीत घेण्यासाठी विद्यापीठ प्रतिनीधी म्हणून नांदेड येथील डाँ.बालाजी विजापुरे आणि हिमायतनगर येथील प्रा.विश्वनाथ कदम हे काम पाहत आहेत, तर परीक्षा शिस्तबद्ध पध्दतीने यशस्वी करण्यासाठी केंद्र साहाय्यक प्रल्हाद सुर्यवंशी, सह साजीद एम.डी, बादे लिंगारेड्डी, पुपलवाड पांडुरंग , गणेश देवसरकर, सुनील सोनकांबळे, पाडुरंग मामा काम करीत आहेत. तसेच परीक्षा हाँलवर पर्यवेक्षाची जबाबदारी डाँ.बेरदेवाड ओम, प्रा. रायभोळे, प्रदीप, आनंद कदम, बालाजी पवार, जमुना जाधव , गजानन सुर्यवंशी, हाके पंकज, वाघमारे सुधीर, संजय ढवळे, गजानन शिंदे, सुनिल पवार, ई. यशस्वीपणे पारपाडत आहेत.