भोकर :-(रमेश गंगासागरे ) मागील अनेक वर्षापासून भोकरचा बकरी बाजार मुख्य रस्त्यावर भरत असल्याने वाहतुकीचे बारा वाजल्याचे दिसून येत आहेत, भोकर नांदेड राज्य रस्त्यावर विश्रामगृहाच्या समोर आणि रेल्वे गेट जवळ मोठा बकरी बाजार भरत असल्याने अनेक वाहनधारक आणि नागरिकांना त्या बकरी बाजाराचा कमालीचा त्रास होताना दिसून येत आहे.
भोकर येथील आठवडी बाजार दर गुरुवारी भरत असल्याने तालुक्यातील व दूरदूरचे बकरी उत्पादक शेतकरी आपल्या बकऱ्या विक्री करण्यासाठी भोकरच्या बाजारपेठेचा आसरा घेत आहेत, या ठिकाणी बकऱ्यांना मोठी मागणी असल्याने इथून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये बकऱ्या आयात केल्या जात आहेत, त्यामुळे भोकरचा बकरी बाजार दिवसेंदिवस पूर्ण रूप घेताना दिसून येत आहे, हा बाजार राज्य रस्तावर भरत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दुचाकीस्वारांना, ऑटो चालकांना, पादचाऱ्यांना, महिला व नागरिकांना अतोनात त्रास होत आहे, याकडे संबंधित नगरपालिकेने तात्काळ लक्ष द्यावे व येथील वाहतुकीची समस्या सोडवावी अशी मागणी भोकर चे सुजान नागरिक करताना दिसून येत आहेत.


0 Comments