भोकर : (रमेश गंगासागरे )  येथील सार्वजनिक गणेश मंडळातर्फे 12 मे रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून विवाह सोहळ्याची जय्यत तयारी मंडळातर्फे सुरू करण्यात आली आहे.
      भोकर येथील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते, याही वर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन मोठ्याप्रमाणात करण्यात आले असून यावर्षी एकूण 17 जोडप्यांचे विवाह या मेळाव्यात करण्यात येणार आहेत, गणेश मंडळातर्फे वधू वरांना कपडे, मनिमंगळसूत्र देण्यात येणार आहेत, सदरील विवाह सोहळा किनवट रोड वरील शंकर भट मंगल कार्यालयात दिनांक 12 मे रोजी दुपारी बारा वाजून 51 मिनिटाला पार पडणार आहेत या विवाह सोहळ्यासाठी शहरातील व तालुक्यातील बहुसंख्य नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गोविंद बाबा गौड पाटील, उपाध्यक्ष सतीश देशमुख, कार्याध्यक्ष नागनाथ घिसेवाड, गणेश पाटील कापसे, सचिव डॉक्टर किरण पांचाळ, कोषाध्यक्ष देवानंद धूत, सदस्य सुभाष पाटील घनतलवार, रावसाहेब लामकानीकर, विठ्ठल माचनवार, नंदू पवार,  बाळा साखळकर, राजू देशपांडे, मोहन श्रीरामवार, सुरेश पोकलवार, अनिल माळवतकर, आदीसह अनेक मान्यवरांनी आवाहन केले आहे.