महाश्रमदानात पांडुरणा ग्रामपंचायतीचे कार्य उल्लेखनीय
भोकर/ पांडुरणा
रमेश गंगासागरे:-
काल दि, 1 मे रोजी भोकर तालुक्यातील मौजे पांडुरणा येथे पाणीफाऊंडेशनने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर लोकसहभागातून कामे करण्यासाठी जलमित्र स्वत: होवुन पांडुरण्यात आले असल्याने लवकरच हे गाव पाणीदार होणार आहे.
महाश्रमदानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्यासाठी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने मोठी जागरूकता निर्माण केली होती, तसेच पांडुरण्यात गर्दी जमवण्यासाठी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी,भोकर विचार विकास मंच, पत्रकार संघटना, तालुका मेडिकल असोसिएशन, शिक्षक संघटना, यांनीही मोठे पयत्न केले होते, त्यामुळे पांडुरण्यात 1 मे रोजी जवळजवळ 3 ते 4 हजार नागरिक श्रमदानासाठी दाखल झाले होते, या सर्व नागरिकांची पाण्याची, जेवणाची, खोदकामच्या साहित्याची आणि योग्य मेडिसिनची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय पांडुरन्याचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी बालाजी इंगळे, सदस्य शिंदे सर, सामाजिक कार्यकर्ते संजय बरकमकर, पत्रकार बरकमकर आणि गावकऱ्यानी केली होती, श्रमदानासाठी आलेल्या जलमित्रांचा यथोचित सत्कारही यावेळी गावकऱ्याच्या वतीने करण्यात आला. तसेच गावात विविध ठिकाणी स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या, उपस्थित सर्व जलमित्राना कामाच्या ठिकाणी वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात नेण्यात आले, यावेळी संपुर्ण कामाचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले होते.
येथील महाश्रमदानात सहभागी होण्यासाठी खा.अशोक चव्हाण, आ.अमिता चव्हाण, यांच्यासह उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार भरत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक विकास पाटील, रेंजर आशिष हिवरे, मुदखेडचे सीआरपीएफचे जवान, एनसीसी चे विद्यार्थी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, पत्रकार मंडळी, भोकर तालुका मेडिकल असोसिएशन, सावली प्रतिष्ठाण, भोकर विचार विकास मंच यांच्यासह जिलह्याबाहेरून असंख्य नागरिक महाश्रमदानात सहभागी झाले होते.


0 Comments