भोकर :- (रमेश गंगासागरे )  येथील श्री शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोकर फेब्रुवारी मार्च 2019 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निकालात शाहू विद्यालयाने आघाडी घेतल्याचे दिसून येते शाहू विद्यालयाचा संपूर्ण निकाल 97.37 टक्के लागला आहे.
        भोकर तालुक्यात शिक्षणाच्या बाबतीत अग्रगण्य विद्यालय म्हणून, श्री शाहू महाराज विद्यालयाचा नावलौकिक आहे, या विद्यालयातील कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी च्या विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात यश प्राप्त केले आहे, यात कला शाखेमध्ये प्रथम कुमारी तोडचेटवाड नागमणी नागोराव 82. 92% , द्वितीय डोंगरे भिमराव रमेश 81. 85% , तृतीय कुमारी मस्के अंजली देवराव 81. 38% , वाणिज्य शाखेत प्रथम कुमारी हामदे रूपाली रूकमाजी 92 .15%,  द्वितीय कुमारी मालेवार आरती विजयानंद 89 .69% , तृतीय कुमारी चेतरवार दिपाली बालाजी 88 .61%, विज्ञान शाखेत प्रथम कुमारी लुंगारे अकांक्षा गंगाधरराव 72% , द्वितीय कुमारी सादुलवार वैष्णवी नारायण 71. 7% , तृतीय कुमारी शेख निदा एमन वजीयोदिन 69. 53%, एच.एस.सी. वोकेशनल शाखा यामध्ये प्रथम शेळके सुनील भगवानराव 83. 69 टक्के, द्वितीय कुमारी उदगिरे सुषमा विठ्ठलराव 79. 7% , तृतीय शेळके आकाश प्रकाशराव 77 .7 टक्के,  तर एमसीव्हीसी या विशेष शाखेचा निकाल 74 .41 टक्के, लागला असून या सर्व गुणवान विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे सचिव श्री श्रीनिवास उर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर, अध्यक्ष एड. लामकानीकर मुख्याध्यापक श्री देशमुख संजय कामनगावकर, एसडी देशमुख , यांनी अभिनंदन केले आहे.