भोकर :-(रमेश गंगासागरे ) येथील सार्वजनिक श्री गणेश मंडळाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह मेळाव्यात यावर्षी 14 जोडपी यशस्वी रित्या विवाहबद्ध झाली असून मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनात कसलीच कमतरता भासली नसल्याने सगळीकडे या विवाह मेळाव्याची चर्चा होत आहे.
महागाईच्या जमान्यात सामान्य नागरिक व वधू वरांना लग्नाचा खर्च करणे परवडत नसल्याने सामूहिक विवाह मेळावे काळाची गरज झाली आहेत, म्हणून अश्या पद्धतीच्या विवाह मेळाव्याकडे येण्याचा सामान्य नागरिकांचा कल वाढलेला दिसून येत आहे, अश्यातच भोकर येथे मागील अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या व गेल्या चार वर्षांपासून सामूहिक विवाह मेळावे राबविणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, त्यांनी या वर्षी अत्यंत नाममात्र दरात गरजू 14 वधू वरांची नोंदणी करून घेऊन सर्व सोईनियुक्त व उपस्थित सर्व वर्हाडी मंडळींची सोय होईल अश्या मंगल कार्यालयात सोहळा पार पाडला आहे, यात वधू-वरांना कपडे, वधुस मनी मंगळसूत्र आणि काही संसार उपयोगी भेटवस्तू भेट स्वरूपात दिल्या.
भोकर किनवट रोडवरील भट मंगल कार्यालयात दि,12 मे रोजी या सुंदर विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यात जिल्हाभरातील 14 उपवर,वधूनी विवाहासाठी गणेश मंडळाकडे नाव नोंदणी केली होती, मेळाव्यासाठी भव्य लग्न मंडप उभारला होता,तर महिलांना बसण्याची वेगळी व्यवस्था केली होती, तर उपस्थितांसाठी सुरुवातीपासूनच स्वरूची भोजची व्यवस्था करण्यात आली होती, विवाहविधी प्रसंगी सुमधुर आवाजात संगीतमय मंगलाष्टके म्हणण्यात आली होती, या विवाह मेळाव्याचे अध्यक्ष गोविंद बाबागौड पाटील, उपाध्यक्ष सतीश देशमुख, कार्याध्यक्ष नागनाथ घिसेवाड, गणेश पाटील कापसे, सचिव डॉक्टर किरण पांचाळ, कोषाध्यक्ष देवानंद धूत, सदस्य सुभाष पाटील घनटलवार, रावसाहेब लामकानीकर, बाबुराव दंडवे, ऍड.परमेश्वर पांचाळ, विठ्ठल माचनवार, नंदू पवार, बाळा साखळकर, राजू देशपांडे, सुरेश पोकलवार, अनिल माळवतकर, आदीसह अनेक मान्यवरांनी विवाह मेळावा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती.या विवाह मेळाव्यातील वधू - वराना शुभाशीर्वाद देण्यासाठी माजी नगरसेवक जवाजोद्दीन बरबडेकर, डॉ, फेरोज इनामदार,पत्रकार रमेश गंगासागरे, यांच्यासह जिल्हाभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते.


0 Comments