भोकर : (रमेश गंगासागरे ) भोकर पासून जवळच उमरीरोडवरील रायखोड पाटीजवल रात्री झालेल्या दोन मोटरसायकलीच्या भिषण अपघातात एक तरुण ठार तर 2 गंभीर जखमी झाा झाले आहेत.
        शनिवारी रात्री 8 ते 8:30 वाजण्याच्या दरम्यान मोटारसायकल क्रमांक एम. एच. 26 A एम 612 आणि दुसरी मोटारसायकल क्रमांक एम. एच. 26 AQ 3973 यांची समोरासमोर जोराची धडक झाली, यात लांमकाणी येथील तरुण नामे, मंगेश गणेश पाटील(जाधव) वय 28 वर्षे हे गंभीर जखमी झाले, त्यांना तात्काळ नांदेड येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु  उपचारास ते साथ देत नसल्याने त्यांचा मृत्यु झाला, त्यांच्यावर लांमकाणी येथे आज रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरा जखमी झालेला ईसम धानोरा येथील असल्याचे समजते. त्यांच्यावरही नांदेड येथील  दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे कळते.
        सदरील अपघाताची फिर्याद अजून तरी भोकर पोलीस स्टेशनमध्ये कोणीही दिली नसल्याने अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र अपघातग्रस्त दोन्ही मोटारसायकली जप्त करून ठाण्यात आणण्यात आल्या आहेत.