भोकर : (रमेश गंगासागरे )  पाणी फाउंडेशन ने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये तालुक्यातील असंख्य गावांनी सहभाग घेतला असून या स्पर्धेची सुरुवात दिनांक 8 एप्रिल पासून होत असल्याने भोकर विकास मंच, शिक्षक परिषद, पत्रकार आणि पांडुरना येथील नवतरुण गावकऱ्यांच्या सहभागाने रविवारच्या रात्री गाव झोपेत असताना पाणी बचतीचा ध्यास घेतलेल्या तरुणांनी हातात फावडे, कुदळ घेऊन प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा केल्याने गावकर्‍यांत नवा उत्साह संचारला आहे.

        पाणी फाउंडेशन ने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये मागील वर्षी हाडोळी या गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता हाडोळी गावचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून यावर्षी अनेक गावांनी पाणी फाउंडेशनच्या या स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे,  काल दिनांक 7 एप्रिल रोजी रात्री भोकर येथील भोकर विकास मंच, शिक्षक परिषद, आणि पत्रकारांनी आवाहन केल्याप्रमाणे या आव्हानास मोठा प्रतिसाद मिळाला रविवारी रात्री पांडुरना येथे ह्या कामाचा श्रीफळ फोडून श्रीगणेशा करण्यात आला, अंधार्‍या रात्री मशालीचा साह्याने रस्ता पादाक्रांत करून पांडुरना जवळील टेकडीवर गावकऱ्यांच्या मदतीने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली, सदरील काम जवळपास दोन तास करण्यात आले.
        या कामात भोकर तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेश्‍वर रेड्डी, किशोर नरवाडे, पत्रकार विठ्ठल फुलारी,  माधव शिंदे, पत्रकार बरकमकर, शिवाजी देवतूळे यांच्यासह शेकडो तरुणांनी सहभाग नोंदवला होता.