भोकर :( रमेश गंगासागरे )  केंद्रात वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्यास मोदींनी बंद केलेल्या जुन्या चलनी नोटा बदलून देऊ असे उदगार ऍडव्होकेट माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी भोकर येथील वंचित बहुजन आघाडी ने आयोजित केलेल्या प्रचार सभेत काढले ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
        दिनांक 8 मार्च रोजी भोकर येथील मार्केट कमिटीच्या भव्य मोंढा मैदानावर सकाळी 11 वाजता सदरील जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी जुन्या चलनी नोटा अचानक बंद करून 60 ,40 चे राजकारण खेळले आहे, जुन्या नोटा बंद झाल्यामुळे अनेक छोटे व्यापारी व नागरिक देशोधडीला लागले याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली, ते म्हणाले की पंतप्रधान चोर नाही तर डाकू सुद्धा आहेत, त्यांनी भारतातील गरिबांच्या पैशावर दिवसाढवळ्या डाका टाकला आहे असे ते म्हणाले, यावेळी मंचावर एमआयएमचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष फिरोज लाला,  धनगर समाजाचे नेते अण्णाराव पाटील,  मातंग समाजाचे नेते रामचंद्र भरांडे, जफर अली खान पठाण, बाबा खान पठाण, जुनेद पटेल, बालाजी खर्डे, नागोराव शेंडगे, सुभाष तेले, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
      प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, नोटा चालू करणे अथवा बंद करण्याचा पूर्ण अधिकार भारताच्या गव्हर्नरला असतो पण, मोदींनी दंडेलशाही करून रातोरात चलनी नोटा बंद करून नागरिकांच्या घामाच्या कमाईवर दरोडा टाकला असल्याचे ते यावेळी म्हणाले. एमआयएमचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष फिरोज लाला यांनी आपल्या भाषणात सांगितले की, काँग्रेसने जातीयतेची राजकारण सुरू केले असून भोकर मध्ये मुसलमानांना अपमानित करण्यात येत आहे, त्यामुळे तमाम मुसलमान बांधव यावेळी काँग्रेस ऐवजी वंचित आघाडी कळे वळला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे बोलताना म्हणाले की, बाळासाहेबांनी माझी उमेदवारी माळेगावच्या यात्रेत कुस्तीच्या फडात खंडोबाला साक्षी ठेवून जाहीर केली आहे,  माळेगाव यात्रे दरम्यान बाळासाहेबांनी मला लंगोट बांधून मैदानात उतरले असून त्यांच्या आशीर्वादाने माझा विजय निश्चितच असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे,  सदरील कार्यक्रमात मातंग समाजाचे नेते रामचंद्र भरांडे, फिरोज लाला, धनगर समाजाचे नेते अण्णाराव पाटील यांची या वेळी भाषणे झाली, त्याच कार्यक्रमात वंचित आघाडीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशनही करण्यात आले, कार्यक्रमास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, सदरील जाहीर सभा ऐकण्यासाठी भोकर व तालुक्यातील खेड्यापाड्यातील हजारो नागरिक आपापल्या वाहनाने येऊन वंचित आघाडी च्या प्रचारासाठी वंचीत आघाडीच्या प्रचारासाठी ॲडव्होकेट माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांना देणगीच्या रूपांमध्ये लाखो रुपये देऊन आपला जाहीर पाठिंबा वंचित आघाडीला असल्याचे दाखवून दिले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिम शाहीर साहेबराव येरेकर आणि शाहीर चंद्रे यांनी केले तर आभार दशरथ भदरगे यांनी मानले.