पांडुरणा :- (रमेश गंगासागरे )  रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत भोकर येथील जलमित्र आणि पांडुरना येथील गावकऱ्यांनी पांडुरना या गावी  सलग तीन तास श्रमदान करून नवा आदर्श घडवला आहे.
        भोकर विकास मंच, भोकर तालुका मेडिकल असोसिएशन, शिक्षक संघटना आणि पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी पांडुरना येथील पूर्वेकडील माळरानावर शेततळे खोदण्याचे काम हाती घेण्यात आले होते, या ठिकाणी संगीताच्या सुमधुर गीतावर अनेक जल मित्रांनी हातात तीकाशी, फावडे घेऊन शेततळे खोदण्यास सुरुवात केली, याकामी त्यांना गावातील सामाजिक कार्यकर्ते मुख्याध्यापक माधव शिंदे, पत्रकार बरकमकर, पांडुरना गावचे सरपंच व गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली.

                       पत्रकारांनी केले श्रमदान

         
        यावेळी दैनिक पुढारी चे तालुका प्रतिनिधी श्री विठ्ठल फुलारी, भोकर न्यूज लाईव्ह चे संपादक तथा दैनिक धर्माबाद वार्ताचे जिल्हा प्रतिनिधी श्री रमेश गंगासागरे, आणि पांडुरना येथील दैनिक देशोन्नतीचे ग्रामीण प्रतिनिधी कमलाकर बरकमकर यांनी सलग तीन तास श्रमदान करून गावकऱ्यापुढे नवा आदर्श निर्माण केला, त्यांचे श्रमदान पाहून गावातील अनेक महिला व पुरुषांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेततळे खोदकामाचे कार्य केले आहे, शेवटी उपस्थित सर्वांना ग्रामपंचायत कार्याालय पांडुरना यांच्यातर्फे नाष्टा व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती, या गावी 1 मे रोजी महाश्रमदान करण्यात येणार असून इथे महाश्रमदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावकरी, सामाजिक संघटना यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पांडुरना गावचे सरपंच, मुख्याध्यापक माधव शिंदे, पत्रकार  बरकमकर यांनी केले आहे.