भोकर : (रमेश गंगासागरे )  भोकर पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे पाळज तालुका भोकर येथील एका शेतकऱ्याच्या गाईवर आज पहाटे
अस्वलाने हल्ला केला, यात शेतकऱ्याची गाय किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त नुकतेच हाती आलेले आहे.
        आज दिनांक 2 एप्रिल रोजी पाळज येथील शेतकरी नारायण डोंगरे यांच्या गोठ्यात काही जनावरे बांधलेली होती सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या एका गाईवर अस्वलाने हल्ला केल्याचे निदर्शनास आले नारायण डोंगरे आणि त्यांच्या परिवारांनी आरडाओरड केल्याने अस्वल जंगलात पळून गेल्याचे अनेक नागरिकांनी बघितले आहे.
         जंगलातील पानवठे आटल्याने हे हिंस्त्र पशु मानवी वस्तीकडे येत असल्याचे भोकर तालुक्यात अनेक उदाहरणावरून दिसून येत आहे, अशातच मौजे रेनापुर ह्याठिकाणी सुद्धा बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे पाळीव जनावरे जखमी झाल्याचे वृत्त आले होते, आज 2 एप्रिल रोजी पाळज येथे पाण्याच्या शोधात निघालेल्या अस्वलाने गोठ्यात बांधलेल्या गाईवर हल्ला चढवला गायीच्या ओरडण्याने शेतकरी आणि आसपासचे लोक गोठ्याकडे धावून आले, तेव्हा अस्वलाने जंगलाकडे कूच केल्याचे निदर्शनास आले, पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येणाऱ्या हिंस्त्र पशू साठी जंगलात पाणवठे तयार करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थ करत असल्याचे दिसून येत आहे.