भोकर : (रमेश गंगासागरे ) दिनांक 4 एप्रिल च्या रात्री भोकर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचे अवकाळी वारे वाहू लागले होते त्यामुळे भोकर तालुक्यातील मौजे देवठाणा येथील शेतकरी प्रकाश मुकिंदराव शिंदे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या दोन बैलावर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विज पडली, त्यातच दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त हाती आले असून, भोकर तहसीलचे कर्मचारी सदरील घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी रवाना झालेले आहेत.
दिनांक 4 एप्रिल रोजी संध्याकाळी भोकर शहर व तालुक्यात विज ही गुल झाली होती भोकर शहरात रात्री अकरा वाजेपर्यंत वीज आली नसल्याने प्रचंड उकाडा जाणवत होता रात्री बारा वाजून वीस मिनिटाला वीज आल्याने नागरिकांना उकाड्यापासून थोडे समाधान मिळाले सध्या उन्हाचा पारा 41 च्या वर जात असल्याने अंगाची लाही लाही होत आहे, दिनांक 4 एप्रिल रोजी दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते संध्याकाळच्या दरम्यान अवकाळी सोसाट्याचा वारा वाहत होता त्या सोबतच काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्याचे वृत्त आहे, अशातच आकाशात विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी वीजेेणे थैमान घातले होते, या या नैसर्गिक आपत्तीमध्ये देवठाणा येथील शेतकऱ्याचे दोन बैल मरण पावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments