भोकर : (रमेश गंगासागरे ) मागील दोन दिवसांपासून मुस्लिम समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्याच्या "त्या" एका पत्रकामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसचा पारंपारिक मतदार मुस्लिम यापासून दूर होत असल्याची भावना व्यक्त केल्या जात होती, पण जगदिश पाटील यांच्या स्पष्टीकरणाने आता "त्या" पत्रकारावरील चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे.
फेसबुक सारख्या अति चर्चिल्या जाणाऱ्या सोशल मीडियावर शमीमोद्दीन ईनामदार यांनी भोकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत एक पत्रक प्रसिद्ध केले होते, त्यामुळे भोकर तालुक्यात मोठी खळबळ माजली होती , या पत्रकावर अनेक राजकीय विरोधकांनी टीका टिप्पणी करत भोकर काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर चालवला होता, शेवटी जगदीश पाटील यांनी या पत्रका बाबत स्पष्टीकरण दिले असून, त्या स्पष्टीकरणात त्यांनी म्हटले आहे की, मी काँग्रेसचा एक निष्ठावंत व जबाबदार कार्यकर्ता असून माझ्या तोंडून कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची मी नेहमी काळजी घेत असतो आणि शमीमोद्दीन इनामदार यांनी हे अत्यंत बेजबाबदारपणाचे पत्रक काढले असून ते चुकीचे असल्याचे त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, स्पष्टीकरणात पुढे म्हटले आहे की, मी असे वक्तव्य केलो नाही व भविष्यात करणार नाही, मी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचे वक्तव्य केल्याचे इनामदार यांनी स्पष्ट केले तर तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा काय मी राजकीय संन्यास घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे, त्यामुळे आता त्या पत्रकावर पडदा पडला असून पत्रका वरील चर्चा थंडावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विरोधकांच्या खेळी चा डाव मोडीत निघाला असून आता विरोधक पुढची कोणती खेळी खेळतात हे पाहण्यासाठी संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments