भोकर : (रमेश गंगासागरे )
नांदेड लोकसभेची निवडणूक नुकतीच संपली असून यात अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, यशपाल भिंगे यांच्यासह 11 उमेदवारांचे भवितव्य दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता मतपेटीत बंद झाले आहे.
नांदेड लोकसभेची निवडणूक नुकतीच संपली असून यात अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर, यशपाल भिंगे यांच्यासह 11 उमेदवारांचे भवितव्य दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता मतपेटीत बंद झाले आहे.
कधी नव्हे एवढी लोकसभेची निवडणूक अटीतटीची आणि उत्कंठावर्धक झाली असल्याने भोकर व भोकर तालुक्यातील नागरिक आता कोण निवडून येणार ? याबाबत काहीच अंदाज लावता येत नसल्याने आता पैजा लावताना दिसून येत आहेत, या निवडणुकीत प्रथमच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी ने मोठी स्पर्धा निर्माण केली असल्याने यात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना कमालीचा घाम सुटला होता, अशोक चव्हाण व प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या आपल्या पप्पांना निवडून आणण्यासाठी गाव पातळीवर अनेक मतदारांच्या भेटीगाठी घेतल्याचे यावेळेस पहावयास मिळाले आहे, ही लोकसभेची निवडणूक कधी नव्हे ती अटीतटीची आणि उत्कंठावर्धक झाली असल्याने या निवडणुकीत खेड्यापाड्यात अनेक मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याची चर्चा गाव पातळीवर होत आहे. सेना भाजप, वंचित आघाडी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपला आपला उमेदवार निवडून येत असल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत, तर भोकर मध्ये काही अतिउत्साही कार्यकर्ते विरोधका सोबत पैजा लावून आपल्या नेत्या प्रतीचे प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालास आता एका महिन्याच्या वर अवधी शिल्लक आहे, तोपर्यंत गावात, शहरात, चौकात व चावडीवर अशाच प्रकारच्या पैजा लावून चर्चा रंगणार आहेत हे मात्र नक्की आहे. 23 मे ला मात्र दूध का दूध पानी का पानी होणार आहे.

0 Comments