नांदेड:(रमेश गंगासागरे )  लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा काल शांततेत  पार पडला. दुसऱ्या टप्प्यात देशभरात ६१.१२ टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान हे पश्चिम बंगालमध्ये झाले आहे. त्यानंतर मणिपूर आणि आसामचा नंबर लागतो.  दुसऱ्या टप्प्यातील ९५ जागांसाठी १६,०० उमेदवार रिंगणात आहेत.
       आसाम, बिहार, छत्तीसगड, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, मणिपूर, ओदिशा, पुडूच्चेरी, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६१.१२ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रातील दहा मतदारसंघांसह देशातील ९५ जागांसाठी काल मतदान झाले.
      नांदेड लोकसभा मतदार संघ मध्ये सुद्धा शांततेमध्ये मतदान पार पडले या मतदानामध्ये महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता, सगळीकडे लांबच लांब रांगा महिलांच्या दिसून आल्या. नांदेड लोकसभेमध्ये प्रताप पाटील चिखलीकर, अशोक चव्हाण, आणि यशपाल भिंगे यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले,
भोकर येथील नूतन शाळेच्या केंद्रावरील चित्र
कर्नाटकातील १०, उत्तर प्रदेशातील ८, आसाम, बिहार आणि ओडीशामधील प्रत्येकी पाच, छत्तीसगड, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मू-काश्मीरमधील दोन, मणिपूर आणि पुदुच्चेरीमधील प्रत्येकी एका जागेसाठी काल मतदान झाले. ओडीशा विधानसभेच्या ३५ जागांसाठीही काल मतदान झाले.