भोकर :(रमेश गंगासागरे ) ह्या सरकारने भोकरसह नांदेड जिल्ह्याला येणारा विकास निधी रोखला पण आम्ही झगडून झगडून निधी मिळवला व कामे केली, भोकर तालुक्यातील दुष्काळ आता संपत आला असून पूर्वीची परिस्थिती आता राहिली नाही लवकरच सुधा प्रकल्पाची उंची मी वाढवणार आहे या सोबतच पिंपळढव, रेणापूर, दिवशी, बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात येईल आणि तेथील कामाच्या शुभारंभाचे श्रीफळ मीच फोडणार असल्याचे भाकीत त्यांनी व्यक्त केले. ते रविवारी भोकर येथील मोंढा मैदानावर आयोजित प्रचार सभेत बोलत होते.
यावेळी मंचावर माजी मंत्री छगन भुजबळ, सत्यजित तांबे, किशोर गजभिये, अप्पाराव सोमठाणकर, संजय लहाणक, बलवंतशिंग गाडीवाले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पपु कोंढेकर, जगदीश पाटील, विनोद चिंचाळकर, हमीदखान पठाण, नगराध्यक्ष संगीता चिंचाळकर, सुलोचना ढोले, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची युती असतांना मंचावर भोकर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोणतेच पदाधिकारी दिसून आले नाहीत, त्यामुळे प्रेक्षकांत कुजबुज सुरू होती, अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, वंचित आघाडी बाबद अनेकांनी संभ्रम निर्माण केला असून वंचित आघाडी भाजपचा खेळ असून वंचित आणि भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दुसरे तिसरे काही नाही, त्यामुळे मतदारांनी गोंधळात न पडता काँग्रेसलाच मतदान करावे, अशोक चव्हाण स्थानिक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याबद्दल तिव्र नाराज असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखवले, ते म्हणाले की, "वड्याचे तेल वांग्यावर टाकू नका ," म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांची सजा मला देऊ नका, माझेच मोठे नुकसान होईल, मी तुमचाच असून तुमचाच राहणार आहे, ज्या कार्यकर्त्याची चूक असेल त्यांना निवडणुकीनंतर पायउतार करण्यात येईल, विरोधक मला चक्रव्यूहात अडकवन्याचा प्रयत्न करत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदेड जिल्ह्यात तीन - तीन वेळा तर दोन वेळा पंतप्रधानांना येऊन माझ्या विरोधात भाषणे द्यावे लागले आहेत, म्हणजे माझी किती भीती यांना वाटत आहे, असे म्हणून त्यांनी मतदारांना भावनिक केले,
अशोक चव्हाण लिडर नसून डिलर आहेत, ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना अशोक चव्हाण म्हणाले की, माझ्याकडे दारूची कुठेच दुकाने नसून मी डिलर नाही, मोदी वर टीका करतांना ते म्हणाले की, "रमण गये, राणी गयी, चलेगये शिवराज मामा,18 के बाद बंद हो जायेगा,चाय वाले का ड्रामा."
मोदी सरकारने ओबीसी विध्यार्थी वर्गाची शिष्यवृत्ती बंद केली असून ओबीसी महामंडळस 1 रुपया पण दिला नसल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामचंद्र मुसळे यांनी केले तर आभार ताहेर बेग यांनी मानले.


0 Comments