भोकर :(रमेश गंगासागरे ) लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्यात आला असून आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेना भाजप युतीचे उमेदवार श्री,प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती, आता नांदेड लोकसभेतील काँग्रेसचे उमेदवार श्री,अशोक चव्हाण यांच्या प्रचारार्थ उद्या दि,14 एप्रिल रोजी छगन भुजबळ आणि जोगेंद्र कवाडे हे येणार आहेत, भोकर येथील मोंढा मैदानावर सकाळी 11 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका काँग्रेस कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
लोकसभेची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून एकमेकांवर चिखल फेकीचे प्रकार वाढले आहेत, आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अशोक चव्हाण यांना आपल्या भाषणात लक्ष्य केले आहे, म्हणून उद्याच्या होणाऱ्या सभेत छगन भुजबळ आणि जोगेंद्र कवाडे कोणास लक्ष्य करतात हे ऐकण्यासाठी संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे. सभेची मोंढा मैदानावर जोरदार तयारी चालू झाली आहे.

0 Comments