भोकर :(रमेश गंगासागरे )  नांदेड लोकसभेचे सेना भाजप युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ उद्या दि,13 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
        भोकर येथील मोंढा मैदानावर सकाळी 11 वाजता सदरील जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बबनराव लोणीकर, मा.खा.भास्करराव पाटील खतगावकर, मा.राज्यमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर,  उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून मोंढा मैदानावर सभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे, प्रशाशनही मुख्यमंत्र्याच्या आगमनाच्या तयारीला लागले असल्याचे या वेळी दिसून आले.