भोकर : (रमेश गंगासागरे ) पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भोकर तालुक्यातील अनेक गावांनी सहभाग नोंदवला असून यात मागील वर्षी हाडोळी या गावाने प्रथम क्रमांक पटकावला होता, चालू वर्षी सुद्धा हाडोळी या गावाने स्पर्धेत सहभाग घेतला असून, भोकर तालुक्यातील अनेक खेडे सहभाग झाले आहेत, अशातच प्रणिताताई देवरे पाटील चिखलीकर यांनी आज सकाळी दि, 11 रोजी हाडोळी येथील कामावर जाऊन कामामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवून गावकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण केला, त्यांनी या ठिकाणी एक तास श्रमदान केले. त्यांच्यासोबत बाजार समितीचे संचालक गणेशराव कापसे, गणपत पिटेवाड,  राजू करपे,  रामराव कोलुरे, माऊली पाटील चिंचाळकर, शिवा जाधव, कमलबाई गाजुलवार, यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
     
         सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून आपले वडील प्रताप पाटील चिखलीकर यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आव्हान ते करत आहेत, त्यांनी भोकर तालुक्यांमध्ये प्रत्येक वाडी तांड्यावर भेटी दिल्या असून त्यांना मतदारांनीही मोठा प्रतिसाद दिला असल्याचे दिसून येत आहे.