रमेश गंगासागरे :-
आज 20 राज्यातील 91 सीटवर मतदानास सुरुवात झाली आहे.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास आज दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळपासून सुरुवात झाली असून यात 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश असे एकूण 20 राज्यातील 91 सीटवर मतदान होत आहे, 91 सीटवर 1279 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, ओडिसा, पश्चिम बंगाल, बिहार, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप यासह इतर 15 राज्यात काही जागेवर मतदानास आज सुरुवात झाली आहे, सगळीकडे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केल्याचे चित्र दिसून येत आहे, छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून ,त्यांनी इडी द्वारे बाँबस्फोट केला या बाँबस्फोटात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.


0 Comments