भोकर : (रमेश गंगासागरे ) यंदाच्या उन्हाळ्याने कहर केला असून वरचेवर तापमानात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे, मार्च संपून एप्रिल लागताच पहिल्या तारखेच्या तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले.
भोकर शहरात दुपारच्या वेळी अनेक नागरिक घरात राहणेच पसंत केल्याने रस्ते ओस पडले असल्याचे दिसून आले, दुपारी १:३० वेळी तापमान 41अंश सेल्शिअस नोंदल्या गेले, अनेकांनी तापमानापासून बचावासाठी थंड ऊसाचा रस पितांना, आणि टरबूज, खानेच पसंत करतांना दिसून येत होते, तर अत्यल्प प्रमाणात नागरिक बाजारात दिसून येत असल्याने बाजारपेठेवरही प्रचंड उष्णतेचा परिणाम झालेला दिसून आला. एप्रिल महिन्यातच तापमानाने एवढी मोठी नोंद केली असून मे महिना अजून शिल्लक असल्याने जाणकार नागरिक उष्णतेच्या परिणामांची कल्पना वर्तवित आहेत.

0 Comments