भोकर :(रमेश गंगासागरे ) लोकसभा निवडणूक 2019 करिता 85-भोकर विधानसभा मतदार संघातील एकूण 329 मतदान केंद्रावरील नियुक्त मतदान केंद्राअध्यक्ष व सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष तसेच राखीव मतदान केंद्राअध्यक्ष व सहायक मतदान केंद्राध्यक्ष यांचे करिता मा. खुशालसिंह परदेशी (अपर जिल्हाधिकारी नांदेड) यांचे अध्यक्षतेखाली ओम लॉन्स भोकर व सामाजिक न्याय भवन - मुलांचे वसतिगृह किनवट रोड, भोकर या ठिकाणी आज दिनांक 26/03/2019 रोजी प्रथम प्रशिक्षण संपन्न झाले आहे.
सकाळी 10 ते 12 व 12 ते 2 च्या दरम्यान या दोन सत्रात मतदान केंद्रावर नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व सहायक मतदान केंद्राध्यक्ष यांना मा. पवन चांडक (सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 85-भोकर विधानसभा मतदार संघ) यांनी त्यांचे कर्तव्य व जबाबदारी बाबत मार्गदर्शन केले आहे तर मा. भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर) व श्री. संतोष घोळक (मास्टर ट्रेनर) यांनी उपस्थित सर्वांना EVM व VVPAT वापराबाबतची सर्व माहिती दिली. सदरील ठिकाणी प्रशिक्षण करिता येणारे मतदान अधिकारी यांची उपस्थिती नोंदविण्याकरिता 15 टेबल (सांकेतिक क्रमांक निहाय) प्रमाणे एकूण 45 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सदरील प्रशिक्षण करिता मतदार संघातील नियुक्त 36 व 3 राखीव झोनल अधिकारी उपस्थित होते.तसेच सामाजिक न्याय भवन, किनवट रोड, भोकर याठिकाणी 13 हॉल निहाय 3 बॅच मध्ये मतदान केंद्राध्यक्ष व सहायक मतदान केंद्राध्यक्ष यांचे नियुक्त झोनल अधिकारी यांचे मार्फत EVM व VVPAT प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले आहे. या ठिकाणी सुद्धा 13 हॉल निहाय परत उपस्थिती करिता 36 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मा. पवन चांडक (सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी), मा. भरत सूर्यवंशी (तहसीलदार भोकर), मा. दिनेश झांपले (तहसीलदार मुदखेड) व मा. सुजित नरहरे (तहसीलदार अर्धापुर) यांचे मार्गदशन प्रमाणे व सूचनांनुसार दोन्ही ठिकाणच्या प्रशिक्षणची व्यवस्था मा. मारोतराव जगताप (नायब तहसीलदार भोकर) व टीमने केली होती.

0 Comments