भोकर :( रमेश गंगासागरे  ) बहुजनाच राज्य वंचितांच्या माध्यमातुन निर्माण झाले पाहीजे त्यासाठी  घरानेशाही नष्ठ केल्याशिवाय लोकशाही बळकट होत नाही असे प्रतिपादन मौजे रावनगाव येथे भारीप बहुजन महासंघ , वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता मेळावा प्रसंगी जिल्हा अध्यक्ष मोहन राठोड बोलत होते.
        या वेळी मंचावर लोकसभेचे उमेदवार यशपाल भिगें ,एमआयएम चे जिल्हा अध्यक्ष फेरोजलाला , लोकस्वराजचे डि डि डोईडवाड , नागोराव शेडंगे, आनंद एडके ,भारीप तालुका अध्यक्ष सुभाष तेले ,बाबाखॉन , वंचीत बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाबुराव राठोड , जुनेद पटेल , भिमराव दुधारे ,दशरथ भदरगे, सुनिल कांबळे , राहुल एडके , सोमेश फुगले आदिची उपस्थीती होती पुढे बोलताना घरानेशाही लोकशाहीला घातक असुन वंचीत बहुजनाची लुट करणारी आहे म्हणुन वंचीत बहुजनानी मतदानाच्या रूपाने नष्ट करून लोकशाही वाचवली पाहीजे असे शेवटी म्हणाले
जिल्हातील मिया बीबी आणि गुलामाला सत्तेतुन हटवा : भिगें
पत्नी आमदार झाली कि तिला खासदार करायच आपन आमदार बनुन मुख्यमंत्री व्हायच अन आपल्या चेल्या चपाट्याना गुलाम बनवायच हि प्रक्रीया थांबवायची असेल तर बहुजन बांधवानी मला निवडुन देवुन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन भिगें यांनी केले क्रार्यक्रमाचे प्रास्तावीक भारीप तालुका अध्यक्ष सुभाष तेले यांनी केले तर  या वेळी फेरोजलाला , नागोराव शेडंगे ,भिमराव दुधारे , बाबाखाॅन, बाबुराव राठोड , डि डि डोईडवाड , जुनेद पटेल आदिनी विचार मांडले क्रार्यक्रमाचे सुत्रसंचलन आभार शाहीर चंद्रे यांनी केले