नांदेड : (रमेश गंगासागरे )  महानायक कांशीरामजी बचत गट नांदेड तर्फे बहुजन समाजाची प्रेरणा मान्यवर कांशीरामजी यांच्या 85 व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम शुक्रवार दि. 15 मार्च 2019 रोजी रात्री 07:00 वाजता भगीरथ नगर, जंगमवाडी रोड, नांदेड येथे घेण्यात आला.
        महानायक कांशीरामजी बचत गट, नांदेडचे पदाधिकारी आणि सभासद यावेळी उपस्थित होते. हणमंत उतकर, विठ्ठल उकंडे, अभिषेक साळे, अनिता देगलूरकर, डिंपल साळे, शिम्पल उतकर, रुकमिनबाई उतकर, भीमराव वाघमारे, अंतोष सुर्यवंशी, संजय वाघमारे, बालाजी टोम्पे, स्वप्नील उकंडे, आर्यदेव उतकर, नागोराव उतकर, विपुल देगलूरकर आदींनी यावेळी मान्यवर कांशीरामजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण केले.
         अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी यावेळी मान्यवर कांशीरामजी यांच्या जीवन चरित्राची सविस्तर माहिती दिली. त्यांनी लिहिलेल्या "बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी" या पुस्तिकेचे वितरण यावेळी करण्यात आले.