भोकर : (रमेश गंगासागरे )  शहरात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत गाडगेबाबा यांची 143 वी जयंती मोठ्या हर्ष उल्हासात साजरी करण्याचे ठरले आहे त्यानिमित्ताने आयोजकांनी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
        दिनांक 10 मार्च रोजी रविवारी सकाळी दहा वाजता नगराध्यक्ष सौ. संगीता विनोद चिंचाळकर यांच्या शुभ हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेची पूजा तसेच दुपारी श्री, उमेश महाराज आर्य राहणार कारंजा जिल्हा वाशिम यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम राहील,  तसेच नगर परिषदेचे कर्मचारी दिलीप वाघमारे यांच्यातर्फे श्री, चक्रधर भजनी मंडळ मौजे पार्डी (वैजनाथ) तालुका मुदखेड, यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे,  सदरील कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून नांदेड येथील गोदातीर समाचार चे संचालक बालाजी ईबीतदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, या सोबतच सदरील कार्यक्रमास उपनगराध्यक्ष  जरीना बेगम शेख युसुफ श्री, नागनाथ घिसेवाड, श्री शिवाजी पाटील किन्हाळकर,  श्री सतीश देशमुख,  श्री गोविंद बाबा गौड पाटील, श्री सुभाष पाटील घनटलवार,  श्री अमोल पवार यांची प्रमुख्याने उपस्थिती लाभणार असून ह्या जयंती सोहळ्यासाठी समाज बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्धी पत्रकान्वये करण्यात आले आहे.