भोकर : (रमेश गंगासागरे ) महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या भोकरच्या यात्रेचा आज पहिला दिवस असून पशु प्रदर्शनास भोकर,भोकर तालुका व जिल्ह्यातील अनेक पशुपालकांनी आपल्या अनेक पशु सह यात्रेत सहभाग नोंदवला, यात्रेत अनेक घोडे मालकांनीही आपले घोडे दाखल केले होते, यात्रेत घोडे हे आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले होते.
पशु प्रदर्शनाचे उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य श्री प्रकाशराव भोसीकर यांनी केले, यात्रेत उत्तम प्रतीची बैलजोडी गट, कालवड गट, घोडे गट, लाल कंधारी गाईंचा गट, संकरित गाईंच्या गट, वासरांचा गट आणि लाल कंधारी गोरे असे वर्गीकरण करण्यात आले होते, यामध्ये प्रत्येक गटातून अनुक्रमे एक दोन आणि तीन क्रमांक निवडण्यात आले होते.
: बक्षीस पात्र बैल जोडी गट खालील प्रमाणे :
प्रथम क्रमांक आनंदराव दगडू पाटील राहणार हसापुर, द्वितीय क्रमांक गणपत रामजी शिंदे राहणार भोकर, तृतीय क्रमांक प्रकाश गंगाराम जाधव राहणार डोर.
: कालवड गटात :
प्रथम क्रमांक मुरलीधर बालाजी आलेवाड राहणार नागापूर, द्वितीय संभाजी गंगाराम राचूटकर राहणार भोकर, तृतीय आकाश गंगाधर यमलवाडा राहणार नागापूर.
: घोडे गटात :
प्रथम क्रमांक सुमित आदिनाथ जैन राहणार भोकर, द्वितीय विठ्ठलराव अमृतराव देशमुख राहणार बारड, तृतीय भाऊसाहेब मारोतराव भोसले राहणार हसापुर.
: लाल कंधारी गाईच्या गटात :
प्रथम क्रमांक बालाजी मारोती पांडुरने राहणार कंधार बाचोटी, द्वितीय गणराज बालाजी शेट्टे, तृतीय संजय सखाराम भुमावाड.
: संकरित गाईच्या गटात :
प्रथम क्रमांक बसवराज रामराव देशमुख राहणार भोकर, द्वितीय शेख फारुक शेख मुजाहिद, तृतीय महेश देविदास यशवंतकर.
: वासरांच्या गटात :
प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर बालाजी पांडुरने राहणार कंधार बाचोटी, द्वितीय संगप्पा गंगाराम पांचाळ राहणार भोकर, तृतीय बसवराज रामराव देशमुख.
: लाल कंधारी गोऱ्हे गटात :
प्रथम क्रमांक विठ्ठल बालाजी पांडुरने, द्वितीय शंकर माधवराव गड्डमवार, तृतीय बालाजी संतुका घिसेवाड.
पशुप्रदर्शनात दाखल झालेल्या पशूंची योग्य रीतीने पारक करून क्रमांक निवडण्या पर्यंत डॉक्टर सुधाकर साळवे भोकर, डॉक्टर दीपक पतंगे, डॉक्टर पी एस खानसोळे, डॉक्टर शेख गुलाम मुक्तदीर मुदखेड, डॉक्टर दगडे, डॉक्टर उडतेवार हदगाव, डॉक्टर अमर चाटे माहूर, डॉक्टर विष्णू बिराजदार आदींनी मोलाचे सहकार्य केले पशु प्रदर्शनामध्ये सहभागी सर्व पशु मालकांना यात्रा कमिटीच्या वतीने उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली, यामध्ये ओम मेडिकल चे मालक विजय मारूडवार यांनी 18 कॅल्शियम चे डब्बे पशुपालकांना वाटप केले तर 12 डब्बे उत्तेजनार्थ वाटप करून नवा आदर्श निर्माण केला आहे, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सर्व पशुपालकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वाटप करण्यात आली.

0 Comments