भोकर : (रमेश गंगासागरे ) दिनांक 19 मार्च रोजी दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या परिसरात लिंबाच्या झाडास गळफास घेऊन एकाने तर भोकर तालुक्यातील धानोरा येथील एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
भोकर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पहिल्या घटनेतील मयत परमेश्वर तुकाराम मुंढे वय 35 वर्ष याने दिनांक 30 मार्च रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या परिसरातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, परमेश्वर मुंडे हे नेमके कुठले राहणारे आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, तसेच त्यांच्या मृत्यूचे कारण ही आतापर्यंत कळू शकले नाही, भोकर पोलीस स्टेशनला पांडुरंग बाबा बेलकर हे दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे वाचमेन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायक नामदेव जाधव हे करत आहेत.
तर दुसऱ्या एका घटनेत धानोरा तालुका भोकर येथील सुलोचना साहेबराव कुरुकवाड वय 35 वर्षे या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
भोकर पोलीस स्टेशनला सोनबा मानेजी कुरुकवाड यांनी फिर्याद दिली की, दिनांक 30 मार्च रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुलोचना कुरुकवाड यांनी गावातील रामप्रसाद माधवराव शेंडगे यांच्या विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे, मरणाचे कारण अद्याप समजू शकले नसून या दोन्ही घटनेने मात्र तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


0 Comments