औरंगाबाद : (रमेश गंगासागरे ) गुरु रविदास हे चमत्कार करणारे महाराज नसून विज्ञानवादी महामानव होते. त्यांची जयंती तिथीनुसार साजरी न करता विज्ञानदिनी औरंगाबाद येथे साजरी करण्यात येते, हे परिवर्तनवादी कार्य आहे असे प्रतिपादन नांदेड येथील साहित्यिक लेखक विचारवंत चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.
एन. 2 सिडको, औरंगाबाद येथे गुरु रविदास जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर हे बोलत होते. गुरु रविदास जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रावण गायकवाड हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या भाषणात चंद्रप्रकाश देगलूरकर हे पुढे म्हणाले की, गुरु रविदास हे त्यागी होते. त्यागाशिवाय कोणतीही चळवळ पुढे जात नाही. आजकालचे कार्यकर्ते सर्व काही फुकट कसे मिळेल ते पाहत आहेत. असे त्यागी नव्हे तर भोगी कार्यकर्ते गुरु रविदास यांची चळवळ पुढे नेऊ शकत नाहीत. गुरु रविदास हे विज्ञानवादी होते. त्यांचे नाव घेणारे कार्यकर्ते देखिल विज्ञानवादी असणे गरजेचे आहे. देव, दैव, अंधश्रद्धा, रुढी, परंपरा नाकारल्यानेच सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त होईल.
गुरु रविदास यांचे नाव, चित्र आणि चरित्र आज व्यवस्थित सांगितले जात नाही. सनातनी व्यवस्थेने त्याचे विडंबन केले आहे. हे एक मनुवादी षडयंत्र असून ते समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु रविदास यांचा अभ्यास करुन १५ फेब्रुवारी ही जन्मतारीख शोधून काढली, त्याप्रमाणे १५ फेब्रुवारीपासून गुरु रविदास जयंती करावी. यापुढे तिथी, पोथी, पुराण, कालनिर्णय यावर बहिष्कार टाकला पाहिजे असेही शेवटी चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणाले.
चर्मकार समाज स्वाभिमानी असून लाचारीचे जीवन जगणे आम्ही कधीच सोडून दिले आहे. गुरु रविदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे मुक्तिदाते आहेत. अन्य बुवा बाबांची आम्हाला गरज नाही. महामानवांमुळे आमचे जीवन बदलत गेले असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात श्रावण गायकवाड यांनी केले.
याप्रसंगी माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ, रामकिशन गायकवाड, डॉ. विश्वनाथ उतकर, सुरेश गवळे यांनीही मनोगत मांडले. राष्ट्रीय गायक हरिदास पुसे (औरंगाबाद) यांनी यावेळी गीतांच्या माध्यमातून प्रबोधन केले. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्भैय्ये, उदगीरचे तालुकाध्यक्ष दयानंद उदबाळे, नगरसेवक मनोज गांगवे, रघुनाथ पद्मे, गणेश भाग्यवंत, विष्णुपंत पद्मने, राध्येश्याम कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
भास्कर लहाने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सचिन वाघमारे, अमोल कुंटे, अशोक कुबडे, बद्रीनाथ सोनटक्के, प्रशांत वाघ, अमोल गाडेकर, गणेश नागवने, पांडुरंग सोनटक्के, गणेश रामटेके आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

0 Comments