भोकर :(रमेश गंगासागरे )  येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कनकाभवन बारचे मालक व्यंकटेश भुरेवार यांची कंन्या कुमारी रितू भुरेवार ही ओंकार फाउंडेशन ने आयोजित केलेल्या नांदेड आयकॉन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून भोकरचे नाव उज्वल केले आहे.

       दि, 25 मार्च रोजी नांदेड येथील श्री, शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नांदेड आयकॉन ही स्पर्धा पार पडली,  या स्पर्धेत जिल्हाभरातील एकूण 40 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता, अनेक चाचण्या नंतर स्पर्धेच्या शेवटी आयोजकांनी रितू व्यंकटेश भुरेवार हिस प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले, पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये, मानचिन्ह, आणि ट्रॉफी असे आहे, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रीतू भुरेवार हीस ट्रॉफी, दहा हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले, रितू हिने नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात इंग्रजी माध्यमांमध्ये बीकॉम चे शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजकांनी आयोजित केली होती, रितू भुरेवारच्या यशामुळे भोकर मधील महाविद्यालयीन युवतींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिचे सर्वस्थरातून अभिनंदन केले जात आहे.