भोकर :(रमेश गंगासागरे )  एकात्मिक बाल विकास सेवा योजनांतर्गत अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी मार्फत पोषण विषयक कार्यक्रम घेण्यात आले 8 मार्च ते 22मार्च 2019 या कालावधीत अंगणवाडी मध्ये विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
       8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला, तसेच या पंधरवड्यात पोषण मेळावा, मुलांचे अर्धवार्षिक वाढदिवस, किशोरीमुलीची बैठक, लहान मुलांसाठी हात धुवा कार्यक्रम, बचतगटाच्या महिलाना माहिती, गरोदर व स्तनदा माता याना या पंधरवाडयात आहाराचे महत्व, तसेच स्वच्छता विषयी मार्गदर्शन केले, बालविकास सेवयोजनचे प्रकल्प अधिकारी प्रकल्प क्रमांक 03 चे श्री, शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, पर्यवेक्षिका सौ, विडेकर मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी उपस्तीताना पोषण विषयक माहिती व ,आहाराविषयक माहिती दिली, ANM  गुठे सिस्टर उपस्तीत महिलांना आहाराचे महत्व पटवून सांगितले या पोषण पधवाड्यात अंगणवाडी सेविका प्रणिता दुधारे शास्त्रीनगर भोकर, अर्चना नरवाडे सईद नगर, जेठीबांगर शकुंतला मुनेश्वर , तक्षशिला हिरे नूतन भोकर यांनी परिश्रम घेतले.