रमेश गंगासागरे
लोकसभेसाठी भाजपच्या वतीने श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावाची नांदेड लोकसभे मधून उमेदवारी जाहीर होताच भोकर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची लाट निर्माण झाली आहे.
लोकसभेसाठी भाजपच्या वतीने श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावाची नांदेड लोकसभे मधून उमेदवारी जाहीर होताच भोकर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याची लाट निर्माण झाली आहे.
मागील दोन दिवसांपासून अनेक वर्तमानपत्रात प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव पुढे येताच नांदेड लोकसभेची निवडणूक आता तिहेरी होणार हे निश्चित झाले आहे यामध्ये भाजपच्या वतीने प्रतापराव पाटील चिखलीकर काँग्रेसच्या वतीने अशोकराव चव्हाण आणि वंचित आघाडीचे डॉक्टर भिंगे असल्याने यांच्यात तिहेरी लढत होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे,
रंगपंचमीच्या दिवशी प्रतापराव पाटील चिखलीकर हे भोकर मार्गे हळदा येथे चालू असलेल्या सप्ताहास भेट दिल्याने हजारो कार्यकर्ते त्यांच्या भेटीची आस लावून धरल्याचे दिसून आले, चिखलीकर भोकर मध्ये आणि हळद्या मध्ये येताच त्यांचे कार्यकर्त्यांच्या वतीने जोरदार जंगी स्वागत करण्यात आले होते ,चिखलीकर यांच्या सोबत ज्येष्ठ कार्यकर्ते राम पाटील रातोळीकर जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी, बीजेपीचे जेष्ठ कार्यकर्ते नागनाथराव घिसेवाड, बीजेपीचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेशराव कापसे पाटील बटाळकर, नगरसेवक संतोष मारकवार, बीजेपीचे तालुकाध्यक्ष गणपत पीठेवाड यांच्यासह अनेकांची उपस्थिती दिसून आली.
प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या धावत्या भेटीने भोकर तालुक्यात राजकीय नवचैतन्य निर्माण झाल्याचे यावेळी दिसून आले असून राजकीय वर्तुळात चिखलीकर यांच्या भोकर भेटीची चर्चा मोठ्या चवीने चर्चिल्या जात आहे.


0 Comments