भोकर : (रमेश गंगासागरे ) सायाळ ता.भोकर हुन प्रवाशी घेऊन जाणारा ऑटो पलटी होऊन झालेल्या अपघातात सायाळ येथील एक नागरिक ठार तर अनेक जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार दि,18 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास सायाळ वरून प्रवाशी घेऊन एक विना नंबर चा ऑटो भोकर कडे येत असतांना डौर शिवारात येताच चालकाच्या निष्काळजी पणाने व भरवेगात चालविल्याने उलटला त्यात बसलेले प्रवाशी नामे बैसाजी गंगाराम गव्हाळे वय 45 ह्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर बसलेले दुसरे प्रवासी जखमी झाले यात बैसाजी गव्हाळे यांचे पुतणे लक्ष्मण प्रभू गव्हाळे ते जखमी झाले पोलिस स्टेशनला लक्ष्मण प्रभू गव्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऑटोचालक मारुती यांच्याविरोधात भोकर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 57 / 2019 कलम 304,(अ) 219, 337 भा.द. वी. सहकलम 134/ 177 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अपघात घडताच आरोपी मारुतीने पोलीस स्टेशनला कसल्याही प्रकारची माहिती दिली नाही, उलट घटनास्थळावर जखमी आणि मयत त्यांना सोडून पसार झाला, सदर घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री स्वामी हे करत आहेत.

0 Comments