भोकर : संदीप गंगासागरे
भोकर हुन मुदखेडकडे जाणारी व प्रवासी वाहतूक करणारी टाटा मॅजिक या गाडीने अचानक पांडुरना घाटात पेट घेतला दैव बलवत्तर म्हणून यात कोणत्याही प्रवाशास इजा झाली नाही सदरील घटना संध्याकाळी 4:30 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.
वृत्त लिहीपर्यंत याबाबत भोकर पोलीस स्टेशनला कसल्याही प्रकारे गुन्ह्याची नोंद झाली नव्हती, काही जाणकार नागरिक व प्रवाशांनी सांगितले की, उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे गाडीने पेट घेतला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत. सदरील लागलेली आग विजवण्यासाठी भोकर नगर परिषदेच्या अग्नी बंबांनी शर्तीचे प्रयत्न केले.

0 Comments