पुणे :
रविवार, दिनांक - १७ मार्च २०१९ रोजी ,
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था , शाखा पुणे जिल्हा अंतर्गत , पहिले वार्षिक पर्यावरण स्नेह- संमेलन , रविवार दि.- १७ मार्च २०१९ या दिवशी अत्यंत उत्क्रुष्टरीत्या पार पडले.
सदर संमेलनास नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे संबंध महाराष्ट्रात कार्यरत असलेले जिल्हा - तालुका पदाधिकारी तसेच पर्यावरण प्रेमी सदस्य  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा. मा.श्री. रंगनाथ नाईकडे - IFS - वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) महा.राज्य यांनी स्वीकारले.
         प्रमुख पाहुणे मा.डॉ. विठ्ठल जाधव - विशेष पोलिस महासंचालक (कारागृह) महा. राज्य, मा.श्री. रंगनाथ नाईकडे - IFS - वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) महा.राज्य यांनी आपल्या भाषणातून संस्थेचे उपस्थित पदाधिकारी तसेच पर्यावरण प्रेमी यांना पर्यावरण संवर्धन काळाची गरज ,व्रुक्ष लावा - पर्यावरण वाचवा , यांवर बहुमूल्य मार्गदर्शन केले.
        सदर पर्यावरण संमेलनास , मा.डॉ. विठ्ठल जाधव - विशेष पोलिस महासंचालक (कारागृह) महा. राज्य, मा.श्री. रंगनाथ नाईकडे - IFS - वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) महा.राज्य, मा. मंजुषा नाईक - उपायुक्त - महाराष्ट्र जी.एस.टी. मुंबई, मा.श्री. सुयोग धस - राष्ट्रीय अध्यक्ष - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ,मा.अ‍ॅड.कमलताई सावंत - राष्ट्रीय उपाध्यक्षा - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट
खेळाडू,मा.श्री.उमाजी बिसेन - अध्यक्ष - आंतरभारतीय शिक्षण संशोधन मंडळ तसेच सचिव - महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ ,तसेच प्रथम भारतीय महिला कुस्तीपटू,मा. दिपक काळे- राष्ट्रीय सचिव - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा. पुष्पकताई केवडकर- राष्ट्रीय सल्लागार - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,मा. अ‍ॅड. यशवंत कांबळे - राष्ट्रीय सल्लागार - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,मा.अ‍ॅड. श्रीराम वाघ - राष्ट्रीय सल्लागार - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा.प्रा. दिपक भवर - महाराष्ट्र राज्य अध्यक्ष - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,  मा.श्री. ज्ञानेश्वर कुंभार - पोलिस नाईक, पुणे आदि उपस्थित होते.
          तसेच संस्थेचे वरीष्ठ राज्य पदाधिकारी, श्री.संजय भालेराव सर - महाराष्ट्र राज्य महासचिव , श्री.देवा तांबे सर - महाराष्ट्र राज्य युवा महासचिव, श्री.नरहरी गरुड सर - महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष, श्री.मधुकर तिरके सर - महाराष्ट्र राज्य सचिव, मा.श्री.दिनेश चिगाटे सर - पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष , मा.श्री.तुषार दळवी सर - पश्चिम महाराष्ट्र सचिव, श्री.दिपक ठाकरे - पूर्व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
तसेच वरीष्ठ - राज्य महिला पदाधिकारी सौ.मेघनाताई वैराळ - महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा, सौ.वर्षाताई भांडारकर - महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा आदि मान्यवर उपस्थित होते.