भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर शहरात परवा बाप आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून भोकर पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोस्को) गुन्हा दाखल करून त्यास दि,15 रोजी आज भोकर येथील न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने आरोपी मारुती टिकेकर यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मागील अनेक दिवसापासून आपल्या अल्पवयीन मुलीवर वाईट नजर ठेवून असलेला मारुती टिकेकर याने अखेर आपल्या वासनेचा शिकार आपल्या पोटच्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला बनवून बापाच्या नात्याला काळीमा फासला आहे, सदर मुलीने भोकर पोलीस स्टेशन गाठून स्वतावर घडलेली आपबिती कथन करून आपल्या आजोबांच्या मदतीने अत्याचार करणाऱ्या नराधम मारुती टिकेकर विरोधात रीतसर तक्रार दाखल केली होती, सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पुनम सूर्यवंशी ह्या करत आहेत.

0 Comments